कविता : ' गूढ रम्य प्रवास '
कविता : ' गूढ, रम्य प्रवास ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : मंगळवार, २८ फेब्रुवारी २०२३ मानवी-जीवन हा एक अत्यंत गूढ, रम्य असा सुखद प्रवास प्रवास म्हटला की नानाविध यात्रेकरुंचा होणारच सहवास ! प्रत्येकाच्या या प्रवास-मार्गात निरनिराळे 'विश्राम' असतात जन्म घेतल्यापासूनच होते या विशिष्ठशा प्रवासाची सुरुवात यात्रेचा पहिलावहिला थांबा, विशिष्ट यात्रेकरूच्या नामकरणाचा सहयात्री म्हणून सहभाग, जन्मदाते आई-वडील-निकटवर्तीयांचा त्या सर्वांबरोबर आनंद-यात्रा जी सुरू होते, ती थेट अनंतापर्यंत ठळक विश्राम-स्थळं प्रभावी छाप पाडून करतात अनुभव-श्रीमंत बाल-मित्र-मैत्रिणींच्या भाबड्या विश्वात उमलती शैशव-पाकळ्या सहयात्रींच्या आठवणी चिरकाल टिकतात मनात, होऊन सावल्या किशोर-वयातील सह-यात्री म्हणजे जणू प्राजक्ताचा सुगंधी सडा भरभरुन वाहत्या धबधब्याच्या फेसाळल्या पाण्याच्या रुपेरी कडा एका-खास-प्रवाश्याचा प्रवेश होतो अन् जीवन-यात्रेचं नंदनवन होतं अग्नी-देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने आणाभाका घेऊन, जीवन धन्य होतं हे सर्वश्रेष्ठ रेल्वे-जंक्शनच पूर्ण प्रवासाला योग्य दिशा व अत्यानंद देतं...