कविता 🌷 ' घरोघरी रामायण ' तारिख - गुरुवार, २५ नोव्हेंबर २०२१
कविता - 🌷 ‘ घरोघरी रामायण ‘
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - गुरुवार, २५ नोव्हेंबर २०२१
वेळ - १ वाजून ७ मिनिटे
का मांडीशी देवा, खेळ हा ऊन-पावसाचा,
अर्थही न कळे जीवा, या सगळ्या गोष्टींचा !
कधी शांत शीतल शिडकावा शीण मिटवणारा
तर कधी जबरदस्त तडाखा, असह्य करणारा !
कधी इवल्या बाळा-समान उमटे भाबडेपणा
तर कधी जीव-घेणारा अर्थहीन तिरसटपणा !
कधी विशाल-हृदय जणू उदार-कर्णाचा अवतार,
तर कधी अतिविषण्ण करणारा काळा-दशावतार !
कधी चोख कर्तव्य-पालन करणारी, ठाम भूमीका
तर कधी असंबध्द-वायफळ-फुकाचा तंटा-बखेडा !
कधी मनमुराद मुक्तपणे हसत-खेळत वागणं-बोलणं
तर कधी कारणा-शिवायचं, भांडण उकरुन काढणं !
कधी लहर अशी की “ तू म्हणशील तीच पूर्वदिशा “,
तर कधी “ सब गया भाड में, हम करें सो कायदा “ !
कधी स्तुती-सुमनांचा अतोनात, अनपेक्षित वर्षाव ...
तर कधी “ बिन-बादल, बेसुरा डराव-डराव-डराव “ !
सत्य-आणि-असत्याची अशी सरफिरी-सर-मिसळ,
तर कधी देव-आणि-दानव यांच्या विचारांची भेसळ !
मानवी-मन हे इतकं विचित्र पण अद्भूत असं रसायन !
कदाचित् त्यामुळेच घडत असावं घरो-घरी रामायण ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Comments
Post a Comment