कविता : 🌷' गणित '
कविता : 🌷' गणित ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : २७ एप्रिल २०२३ वेळ : दुपारी, १२ वाजून ११ मि. आजवर नक्की काय मिळवलं अन् काय राहीलंय बाकी ? रीतसर गणित मांडून, अजून वसूल करायची थक-बाकी ! काही गोष्टी कळत-नकळत, तर बेफिकीर-वृत्तीमुळे काही हातून घडलेल्या स्मृती-घटना-कृत्यं, भूतकाळातल्या पूर्वी साक्षी-भावाने पाहता, आज त्याच घटना वाटती नगण्यं रंगहीन-फिक्कट-निरर्थक-कस्पटासमान व प्रभाव-शून्य ! उथळ पाण्याला खळखळाट फार'-तारुण्याचा उसना जोश आयुष्याच्या रम्य सांजवेळी जाणवतं, ते होते आपलेच दोष ! वाटतं, त्यांना अवाजवी महत्व देऊन फुकाचं होतं ते झुंजणं ! आपल्या माणसांवीण सर्वच निरर्थक, फार उशिराने कळणं ! मनात अढी बाळगून, कैक सुखदायी क्षणांना पारखे होतो, मनाला पोखरुन 'राईचा पर्वत करुन' निष्कारण भरकटतो ! क्षुद्र-क्षुल्लक गोष्टी डोळेझाक करुन, जगणे ही कला आहे, सुख-मन:शांति टिकवून ठेवण्यास तीच अत्यावश्यक आहे ! सुखाला गुणून-क्रोधाला भागून, दुःखाला देता येतो मस्त डच्चू इतपत जरी गणित जमलं, तरी जीवन संपूर्ण-सफल होई बच्चू ! @तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆