कविता - 🌷 " तृप्त-मस्त-मौला "
कविता - 🌷 " तृप्त-मस्त-मौला " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - रविवार, १६ जून २०२४ वेळ - रात्री, १० वाजून २६ मि. जमखंडीच्या जवळच एक कुल्हळी नामक गाव आहे आपटे-घराणे-पूर्वजांना शौर्यासाठी इनाम मिळाले होते गावात खास मातब्बर कुटुंबांत आपटे घराण्याची प्रतिष्ठा मोठा चौसोपी चिरेबंदी वाडा व स्थावर-जंगम-मालमत्ता आपटे कुटुंब श्रीमंत, गावातील शेत-जमिनी मालकीच्या माझ्या वडिलांना चार भाऊ आणि तीन बहिणीही होत्या एकत्र-कुटुंबपद्धती-मोठ्याकाकांची मुलं"काका"म्हणंत त्यामुळे वडीलांना आम्ही सगळे पण 'काका' म्हणायचो त्यांचा नितळ गौर वर्ण-मध्यम बांधा-उंची,निकोप प्रकृती स्थितीप्रिय,भोळा स्वभाव,पण सावकारी अंगात मुरलेली काकांच्या नोकरी-निमित्ताने आम्ही मिरजेत राहू लागलो मोठ्ठं घर, माडी, समोर बाग,पाठीमागे अंगण-मजेत होतो आमची आई शिस्तप्रिय पण आमचे काका अत्यंत प्रेमळ आईकडे डाळ शिजली नाही की काकांना घालायचो गळ सगळे लाड पुरवायचे पण आईच्या शब्दाचा मान ठेवूनच त्यांचं स्वतःचं असं एक विश्व होतं, त्यातच ते रमत असत मुं...