कविता - 🌷 ' डोळ्यांचा आरसा '. तारिख - शनिवार, २७ एप्रिल २०२४

कविता - 🌷 ' डोळ्यांचा आरसा '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले 
तारिख - शनिवार, २७ एप्रिल २०२४
वेळ - रात्री ८ वाजून २४ मि.

हसू आणि आसू तितकेच खरे दोन्ही
आयुष्यात काय होणार सांगावे कुणी ?

एक दिवस सुखद सुंदर रिमझिम होते
दुसऱ्या दिवशी जीवघेणी तलखी होते 

एका डोळ्याच्या कडा हसून पाझरती
दुसऱ्या क्षणी दु:खाचे अश्रु ओघळती

क्षणभर सोनेरी, कोवळं ऊन पांघरून 
भर-पावसात चिंब-चिंब भिजून यौवन 

कितीही हसरा चेहरा, आर्त गहिरे डोळे 
अंतरातील सूक्ष्म-भाव नेत्रांमधून तरळे 

नयन असे जादूगार, करतील जादूटोणा 
डोळ्यांच्या आरशामध्ये प्रितीच्या खुणा 

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆





















Comments

Popular posts from this blog

कविता - 🌷 " परी या-सम-हा " तारिख - १० डिसेंबर २०१६

कविता 🌷 " एहसास "

Poem - 🌷 " Live in Alignment " Date - 31 March 2025