कविता - 🌷 ' डोळ्यांचा आरसा '. तारिख - शनिवार, २७ एप्रिल २०२४
कविता - 🌷 ' डोळ्यांचा आरसा ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - शनिवार, २७ एप्रिल २०२४ वेळ - रात्री ८ वाजून २४ मि. हसू आणि आसू तितकेच खरे दोन्ही आयुष्यात काय होणार सांगावे कुणी ? एक दिवस सुखद सुंदर रिमझिम होते दुसऱ्या दिवशी जीवघेणी तलखी होते एका डोळ्याच्या कडा हसून पाझरती दुसऱ्या क्षणी दु:खाचे अश्रु ओघळती क्षणभर सोनेरी, कोवळं ऊन पांघरून भर-पावसात चिंब-चिंब भिजून यौवन कितीही हसरा चेहरा, आर्त गहिरे डोळे अंतरातील सूक्ष्म-भाव नेत्रांमधून तरळे नयन असे जादूगार, करतील जादूटोणा डोळ्यांच्या आरशामध्ये प्रितीच्या खुणा 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆