Posts

Showing posts from August, 2023

कविता : 🌷' पवित्र बंध '

कविता :🌷' पवित्र बंध ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : बुधवार, ३० ऑगस्ट २०२३ वेळ : १२ वाजून १२ मि. रक्षाबंधन अन् माहेर आहे जणू अद्भुत-जादू-रसायन  श्रावण-पौर्णिमेला यथासांग, साजरा करतात हा सण स्त्री वयाच्या कुठल्याही उंबरठ्यावर जरी असली तरी,  जपते माहेरचे ऋणानुबंध अन् दोन्ही घरची नाती-गोती माहेरच्या ओढीने त्याचं महत्त्व वाढत जातं कैक पटीनं, 'माहेर'चं हृदयस्थ असतं एक खास स्थान त्याच्या परीनं भाऊ म्हणजे बालपणापासूनचा सुख-दु:खांचा सोबती त्यामुळे ते नातं अतूट-मायेचं-जवळचं-अन्-आनंददायी  बहिण-भाऊ हे एकमेव असं नातं, जे निखळ प्रेरणादायी गुण-दोषांसकट एकमेका सांभाळून हे चिरंतन सुखदायी  भाऊ लहान असो वा मोठा, कायम देतो भक्कम आधार राखी बांधल्याने याच कोमल भावना होती प्रत्यक्ष साकार ! सिकंदरच्या पत्नीने, हिंदू-सम्राट-पुरूला राखी-बंधू मानला, अलेक्झांडरला जीवदान देत, जणू पुरूने बंधू-धर्म पाळला ! बळीराजास रक्षा-सूत्र बांधून, लक्ष्मीने त्यास भाऊ बनविला ! तिच्या सन्मानार्थ बळीने स्वर्ग-लोकी जाऊ दिले श्रीविष्णुला  रक्षासूत्र बांधण्याचा तो पावन दिन होता श्रावण-पौर्णिमेचा, आज...

कविता :🌷' मला सांगा '

कविता :🌷' मला सांगा ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : मंगळवार, २९ ऑगस्ट २०२३ वेळ : दुपारी ३ वाजून ५९ मि. मला सांगा सुखी होणं म्हणजे नक्की काय असतं ? क्षण-न्-क्षण इवल्याशा जीवात तन-मन रमून जातं दाही दिशांनी दुडु-दुडू धावत-येऊन अंगाला बिलगतं बघता-क्षणी कुणाच्याही कडेवरुन बेधडक झेप घेतं ! बाहेर जाता मोठ्या-टपोर्या डोळ्यांनी जग टिपून घेतं कडेवर असता दुधाळ-सुगंधाने मनास चिंब भिजवतं एखाद्या वेळी थोडं दुर्लक्ष झालं तर कावरं-बावरं होतं दुसऱ्याच क्षणी सगळं विसरुन चक्क खिदळू लागतं ! काऊ-चिऊ-माऊच्या गोष्टींमध्ये समरसून गुंगुन जातं मोठ्या-आवाजात-कुकरच्या शिट्टीने घाबरुन-गुट्ट होतं  पक्षांचा किलबिलाट ऐकून आनंदाने गोड हुंकार भरतं मधाळ आवाज करत मऊ-मखमली गालांचा पापा देतं एखाद्या वेळेस थोडं दुर्लक्ष झालं तर कावरं-बावरं होतं दुसऱ्याच क्षणी सगळं विसरुन चक्क खिदळूच लागतं वामकुक्षी घेत साखर-झोपेत इवल्या हातांनी मिठी मारतं, स्वर्ग-सुख म्हणजे तरी याहून जास्त काय बरं असू शकतं ? 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता :🌷' नैया पार '

कविता :🌷' नैया पार ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : १५ ऑगस्ट १९९५ वेळ : ७ वाजून ५२ मि. तेरा मेरा ये नाता  टूटेना पलभर विधाता सदा अपना ये जीवन रहे तेरे चरणों में दाता || ध्रु || जिये पल-पल हम सब तेरी आस पर विधाता नाम तेरा दीपक बन कर, राहें हमें दिखाता || १ || हम से यूं ही भूल हुई तो तेरी शरण में हम आतें साथ तेरा अगर मिल जाये, जीवन सफल हो जाता || २ || कर के सुमिरन हर रात और दिन भूले न इक पल ओ दाता नाम तेरा तारक बन कर, नैया पार लगाता || ३ || 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता 🌷' स्मृतींचं मोहोळ '

कविता 🌷' स्मृतींचं मोहोळ ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख बुधवार, २३ ऑगस्ट २०२३ वेळ : संध्याकाळी, ५ वाजून ३३ मि. माहेराची ओढ असे जगा-वेगळी क्षणभरात खुलते मनाची गं कळी  कशी गुंतवून ठेवू वेड्या मना बाई, फिरफिरुनी जाई माहेरी वेळोवेळी माहेरचा गं ध्यास मनासी लागता, तहान-भूक लोपली बघता-बघता झोप ही उडाली स्वप्न-रंजन करता कशी बाई थोपवू या वेड्या चित्ता ! झुलतो हा मधुर स्मृतींचा हिंदोळा आठवणींचा गोफ-माहेरचा लळा  झर-झर पाझरत नेत्रांत जिव्हाळा वेध गं माहेराचे-जीव आतुर खुळा  माहेर म्हणजेच आठवांचा गहिवर माहेर म्हणजे नात्यांचा हृद्य मोहोर वात्सल्याचा स्पर्श-व-मायेचा पदर  स्मृतींचं मोहोळ-दाटून येई गं अंतर ! @तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता :🌷' एक सुखद-हमी '

कविता :🌷' एक सुखद-हमी ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : सोमवार, २१ ऑगस्ट २०२३ वेळ : संध्याकाळी, ५ वाजून ११ मि. "बालपण देगा देवा" असंच काहीसं, सदा-सर्वदा सगळ्यांचं मागणं ! खरं तर म्हातारपण हे देवानं मानवाला बहाल केलेलं दुसरं बालपण सगळ्यांना नकोसं वाटतं आयुष्याच्या अखेरीस येणारं हे म्हातारपण   प्रत्येकासाठी अबाधित सत्य एकच-जन्म-बाल्य-तरुण व वृद्ध होणं ! आयुष्यभराच्या चुकांच्या बोचर्या-जाणीवेने वृद्धत्व नकोसं होत असावं, पश्चातापानं प्रायश्चित्त करावंसं वाटलं तरीदेखील ते तितकसं सोपं नसतं,  वेळ गेलेली असते आणि विशेष काही करण्यास शरीर साथ देत नसावं ! वृद्धांच्या-प्रश्नांकडे लक्ष वेधण्या,'जागतिक-जेष्ठ-नागरिक-दिन' सुरु झाला  हा दिन जागरुकतेने वयोवृद्धांच्या सामाजिक-योगदानाची दखल घेण्याचा,  या निमित्ताने त्यांचं कौतुक-प्रशंसा करुन-त्यांना मनोबल-आधार देण्याचा  ज्यांनी निःस्पृहपणे योगदान दिले त्यांचा सुयोग्य मान-सन्मान करण्याचा ! पूर्वी वृद्धांची जबाबदारी असायची, महत्वाचे-कौटुंबिक-निर्णय घेण्याची  त्यांना मान देऊनही-कुटुंबातील-सदस्यांना आदरयुक्त भीती असाय...

कविता 🌷' श्रावण सखा '

कविता 🌷' श्रावण सखा ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : गुरुवार, १७ ऑगस्ट २०२३ वेळ : १२ वाजून २३ मि. तो येतो अन् येते आनंददायी सुखद लहर त्या संगे येतो अगणित पाना-फुलांना बहर घुमतो, पशु-पक्षी-नद्यांचा मंजुळ नाद-स्वर जाणीव होते, श्रावण सखा आल्या-नंतर  एका-हिरव्या-रंगाच्या किती छटा ढिगभर  तरी प्रत्येक रंग-छटा अत्यंत मोहक-सुंदर ! छटा-न्-छटा तना-मनास भुरळ घालणारी  क्षणार्धात डोळ्यांत भरणारी-सुखावणारी सौंदर्याने जणू नजरेला खिळवून ठेवणारी ! स्वागतार्ह सख्याच्या वनवेलींचा बांधला झुला  हिरवा-कंच-मखमली जणू गालीचा अंथरलेला नक्षी रंगी-बेरंगी फुलांची-वेल-बुट्टी-चितारलेला पिवळ्या धम्म उन्हात न्हाऊन श्रावणात-सृष्टी, भासते जणू ही हळद लागता नव-वधू-लाजरी श्रावण-सख्याचे मंद स्मित-डुलती वृक्ष-वल्लरी श्रावणात सजली ही अवघी सृष्टी नव-वधू-गत नख-शिखांत साज-शृंगार, नटून-थटून सज्ज ! हिरवा शालू, हाती वरमाला-नाकात शोभे नथ ! हिरवागार निसर्ग-अंगोपांगी नव-चैतन्य फुलून  रिमझिम श्रावणसरी-वाजे हलकी-फुलकी धुन  हर्षानंदाला उधाण येऊन सणासुदीची धामधूम 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता 🌷' तो येतो तेव्हा '

कविता 🌷' तो येतो तेव्हा ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : गुरुवार, १७ ऑगस्ट २०२३ वेळ : १२ वाजून २३ मि. तो येतो अन् येतेच आनंदाची सुखद लहर त्या सवे येतो अगणित पाना-फुलांना बहर हर्षित पशु-पक्षी-नद्यांची मंजुळ नाद-लहर जाणीव होते, श्रावण सखा आल्या-नंतर  एका-हिरव्या-रंगाच्या किती छटा ढिगभर  तरी प्रत्येक रंग-छटा अत्यंत मोहक-सुंदर ! छटा-न्-छटा तना-मनास भुरळ घालणारी  क्षणार्धात डोळ्यांत भरणारी-सुखावणारी सौंदर्याने जणू नजरेला खिळवून ठेवणारी ! स्वागतासाठी पाना-वेलींचा बांधला असे झुला  हिरवा-कंच-मखमली जणू गालीचा अंथरलेला वरुन रंगी-बेरंगी फुलांची वेल-बुट्टी-चितारलेला श्रावण सख्यासाठी अवघी सृष्टी नव-वधू-गत नख-शिखांत साज-शृंगार, नटून-थटून सज्ज ! हिरवा शालू, हाती वरमाला-नाकात शोभे नथ ! हिरवागार निसर्ग, अंगी लेवून पिवळं-धम्म ऊन रिमझिम श्रावणसरीं, वाजे हलकी-फुलकी धुन  हर्षानंदाला उधाण-वरुन सणासुदीची धाम-धूम 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता 🌷' अनमोल बंध '

कविता 🌷' अनमोल बंध ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : बुधवार, १६ ऑगस्ट २०२३ वेळ : रात्री ९ वाजून ०५ मि. आयुष्यात अशी एक वेळ नक्की येते जेव्हा खरं ऐश्वर्य म्हणजे काय समजते पैशांचं 'मायाजाल' किती फोल, कळते नात्यांची किमया अनमोल हे जाणवते ! हृदयाशी घट्ट निगडित गोष्टीच बहुमोल, उमगते की बाकीचं सगळंच माती-मोल  मालमत्ता-गाड्या-बंगले सर्व कवडीमोल  आपल्या माणसांच्या शिवाय सारं फोल ! ऊनपाऊस-अरिष्टांची झळ नको यांना  जीवापाड जपायलाच हवं याच बंधांना खेचताण नको कोमल नाजुक पाशांना असा अमूल्य ठेवा लाभतो भाग्यवंतांना ! @तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता 🌷' परम-शक्ती '

कविता : 🌷' परम-शक्ती ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले,  तारिख : रविवारी १३ ऑगस्ट २०२३ वेळ : दुपारी, २ वाजून २७ मि. दोन-जीवांस जोडी, कोणती शक्ती ? कोण लावी दोघा ओढ मिलनाची ? कोण करी नवजीवाची-नवनिर्मिती ? वात्सल्य-माया कोण निर्माण करी ? कठोर हृदयाला पाझर कोण फोडी ? दया-क्षमा-शांतीचे झरे कोण सोडी ? भव-दु:खाची विस्मृती कोण घडवी ? कोण देई परम सुखाची दिव्यानुभूती ? कोण खेचते नद्यांना समुद्रांकडे ? कोण‌ निर्माण करी मोठ्ठे पर्वतकडे ? कोण घाली भयंकर गारांचे सडे ? कोण बळ देई म्हणून पाखरु उडे ? रात्रीनंतर उजेडाकडे कोण न्हेई ? वीतभर पोटात कोण भूक देई ? रेताड जमिनीत कोण देई पाणी ? कोण‌ खारट करी सागराचं पाणी ? कोण भडीमार करी संकटांचा ? कोण जोश देई मात करण्याचा ? कोण किरण दाखवी आशेचा ? कोण अदृश्य हात, देई मदतीचा ? कोण रक्षी अनाथ-बाल-जीवांना ? कोण देई शिक्षा-दंड दुष्ट-अधमांना ? कोण देई जिवंतपणी नरक-यातना ? कोण पेटवी सूडाची अघोरी भावना ? कोण घाली घास भुकेल्या मुखी ? कोण पुसतो अश्रु, असता दु:खी ? कोण करी भूकंप वा ज्वालामुखी ? कोण देई दृष्टांत, लागता समाधी ? पाप-पुण्याचा हिशोब कोण ठेवी ? पापांची...

कविता :🌷' कोण '

कविता : 🌷' कोण ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : रविवार, १३ ऑगस्ट २०२३ वेळ : दुपारी, २ वाजून २७ मि. दोन-जीवांस जोडी कोणती शक्ती ? कोण लावी दोघा ओढ मिलनाची ? कोण करी नवजीवाची-नवनिर्मिती ? वात्सल्य-प्रेम कोण निर्माण करी ? कठोर हृदयाला पाझर कोण फोडी ? दया-क्षमा-शांतीचे झरे कोण सोडी ? भव-दु:खांची विस्मृती कोण घडवी ? कोण देई परम सुखाची अनुभूती ? जायबंदी जीवांना कोण वाचवी ? पराभूता कोण देई पुन्हा उभारी ? निराशेच्या गर्तेतून कोण वाचवी ? हताश जीवनी कोण आणी गोडी ? कोण खेचते नद्यांना समुद्रांकडे ? कोण‌ तयार करी मोठ्ठे पर्वतकडे ? कोण घाली भयंकर गारांचे सडे ? कोण बळ देई म्हणून पाखरु उडे ? रात्रीनंतर उजेडाकडे कोण न्हेई ? वीतभर पोटात कोण भूक देई ? रेताड जमिनीत कोण देई पाणी ? कोण‌ खारट करी सागराचं पाणी ? कोण खेचते नद्यांना समुद्रांकडे ? कोण‌ तयार करी मोठ्ठे पर्वतकडे ? कोण घाली भयंकर गारांचे सडे ? कोण बळ देई म्हणून पाखरु उडे ? कोण भडीमार करी संकटांचा ? कोण जोश देई मात करण्याचा ? कोण किरण दाखवी आशेचा ? कोण अदृश्य हात देई मदतीचा ? कोण रक्षी अनाथ-बाल-जीवांना ? कोण देई शिक्षा-दंड दुष्ट-अधम...

कविता :🌷' तरंग '

कविता :🌷' तरंग ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : शुक्रवार, ११ ऑगस्ट २०२३ वेळ : ९ वाजून २७ मि. चांदण्यात चंद्रमा हरपला  टिमटिम चमके तारा फडफडला वा-यावर अलगद उडवी खट्याळ हा पदरा || धृ || अजुनी त्याची गाठ न पडली इथवर आले पाणी जळी स्थळी राधेला भासे कान्हा वाजवी मुरली  पाण्यावरती तरंग उमटला  साद घाली किनारा || १ || गंगेच्या पाण्यात पहुडली  ती हंसांची जोडी  तिच्या कोमल पंखांवरती पिलं कोवळी वसती वात्सल्याची ओढ अनामिक  मायेचा हा फुलोरा || २ || जादूच्या फसव्या नगरीत क्षण सुखाचे आले गो-या गालांवर लज्जेचे गोड गुपित हे बोले प्रितीच्या रंगाने न्हाला मदनाचा इशारा || ३ | जागोजागी लपाछपीच्या जोवर असती वाटा  तशा ठिकाणी कसे जगावे जीवनाच्या या व्यथा  अंत:करणी शब्द उमटला  व्यर्थ सारा पसारा || ४ || @तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता :🌷' आनंद मावेना '

कविता :🌷' आनंद मावेना ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : बुधवार, ९ ऑगस्ट २०२३ वेळ : दुपारी ४ वाजून ४१ मि. गोप-गोपिका सार्या जमल्या घरोघरी श्रावणसरी गं आल्या या नाचत दारी पहिल्या-वहिल्या वर्षावाने सुखावली सृष्टीच्या हृदयी प्रीत-वेल ही अंकुरली पक्षी-पिलं, मुलं-बाळं हर्षाने बागडली  पर्जन्याच्या येण्याने जणू जादू झाली ! जिकडे तिकडे ही उधळण शत-रंगांची नजर जाई तिथवर पखरण सौंदर्याची  डोळे मिटता नाना-फुले गंध दरवळती गुंजारव करीत भ्रमर कमळांना शोधती  भरधाव वेगे प्रेमातुर-नद्या धावती सागरी जल भरणा राधिका निघाली यमुना-तीरी चाहूल ऐकता भेटण्यास थेट गेला मुरारी खूण म्हणून कान्हा छेडी हलकेच बासरी ! मनसोक्त आनंदाची नितांत सुंदर बरसात प्रत्येक जन-जीव-तृप्त, होऊन बिनधास्त  मृदू-रेशमी-कोमल-स्पर्श मोरपंख मुकुटात हरि दिसता, राधेचा आनंद मावेना हृदयांत ! @तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता :🌷' दिव्य-झंकार '

कविता :🌷' दिव्य-झंकार ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : गुरुवार, ३ ऑगस्ट २०२३ वेळ : संध्याकाळी, ८ वाजून २३ मि. मंदिरात गेल्यावर घंटा वाजवली की छान-प्रसन्न वाटतं, बालपणी देवळात जाण्यास तेच मोठं आमिष असायचं ! टाचा उंचावून प्रयत्नांनी घंटा वाजवण्याचं अप्रूप वाटायचं, ती विलक्षण रोमांचक गंमत संपूच नये असं वाटंत राहायचं मंदिरी जाऊन घंटानाद केलाच नाही तर मग कसली मजा ? भोजनाला जाऊन न जेवताच येण्यासारखी आहे ही सजा ! महान् विभूतींच्या अस्तित्वानेच वास्तु पावन-पवित्र होतात, अशा वास्तुत चैतन्यदायी शुभ-शक्ती सदैव संचार करतात ! साधु-संत-महंतादि विद्वान-दिव्य-व्यक्तींच्या पायधूळीमुळे, वास्तु-परिसराचा कण-न्-कण भारित होतो विशेष उर्जेने ! लहान-थोर सर्वांना ही सकारात्मक उर्जा चुंबकासम खेचते, या पवित्र-स्थळी जाण्याची मनस्वी ओढ म्हणूनच तर लागते  एकदा सुप्रसिद्ध प्राचिन मंदिरास भेट देण्याचा योग आलेला, तिथली मोठ्ठी पितळी घंटा वाजविण्यास जीव-आतुर झालेला ! ती वाजविता सप्त-स्वरांच्या-ध्वनीने भरे भव्य-मंदिर-गाभारा, प्रणव-स्वराच्या-प्रतिध्वनींनी पूर्णतया तुडुंब-तृप्त-मन-गाभारा ! ती अत्यंत-दुर्मिळ-...

कविता :🌷' नेमेचि येतो '

कविता : 🌷' नेमेचि येतो ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : रविवार, ३० जुलै २०२३ वेळ : सायंकाळी, ५ वाजून ५८ मि. डोळ्यात प्राण आणून सृष्टी, जन-जीव ज्याची चातकासारखी वाट बघतात, तो पर्जन्य-ऋतु जरी एकच असला, तरी त्याचे बरेच भाऊबंद असतात ... रिमझिम पाऊस : निरागस बाळाच्या बाळ-लीला,  त्याचं हसणं-बागडणं-हुंकार देणं म्हणजेच सुखाचा रिमझिम पाऊस  मुसळधार पाऊस : ५-६ किशोरवयीन मुलं/मुली जमली की  त्यांच्या खळखळून हसण्या-बोलण्यातून  कोसळत राहतो आनंदाच्या जल्लोषातून तोच हा मुसळधार पाऊस  पावसाची रिपरिप : बाहेर पडणारा पाऊस थोडा थांबला तरी,  बायको नाराज झाल्यावर तिच्या सततच्या  कुरबुरीतून होतच राहते  ती ही कंटाळवाणी रिपरिप पावसाची झड : मनातल्या मनात धुसफुसणा-या दोन शेजारणींमध्ये/जावांमध्ये, बहिणी-बहिणींमध्ये शेवटी वादळी-वादाची "आमनेसामने"अशी  एकदाची फैर झडते ...मग कुठे अंमळ शांतता नांदते ! हीच ती झोडपून जाणारी पावसाची झड  धावता पाऊस : छत्री हरवून, चिंब भिजून, लपत-छपत नवरोजी घरात घुसत असता,  त्याला ' रंगेहाथ ' पकडून तत्क्षणी बायकोचा उत्स्फूर्त-विजय...