Posts

Showing posts from May, 2023

कविता : 🌷 ' सहनशीलता '

कविता : 🌷 ' सहनशीलता ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : गुरुवार, २५ मे २०२३ वेळ : ११ वाजून ४३ मि. खरंच किती गूढ-अगम्य आहे मानवी जीवन जन्म होतो-संस्कारांचे सोपस्कार होतात पण, फारकाळ कधी-कुठे रमतच नाही चंचल मन   कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे सतत वागतो आपण ! खरं तर जेव्हा कशाचाच भरवसा वाटत नसतो, आलेला प्रत्येक अनमोल-क्षण वाया का दवडतो? खुळ्या सारखे सुखाच्या भ्रामक कल्पनेत रमतो ! हातचं सोडून पळत्याच्या मागेच मोकाट धावतो ! स्वभावानं सहनशील असणं ही चांगलीच गोष्ट  आणि ती प्रयत्नान्ती, नक्की वाढवायलाच हवी पण दुसऱ्यांनी गृहीत धरावं इतकीही ती नसावी  चुकीचा पायंडा बिल्कुल न पाडणारी ती असावी अरेरावी-मग्रूरीला खत-पाणी घालणारी ती नसावी  गरजवंताला मदतीचा हात पुढे करणारी ती असावी स्वतः सहन करुन, चुकीची दुरुस्ती तर होतच नाही ! चूक करणार्याच्या लक्षात ती आणून द्यायलाच हवी ! त्यासाठी बाचाबाची-भांडण करण्याची गरजच नाही, काम होऊ शकतं हसून-खेळून-सहानुभूती दाखवूनही  जाणीव झाल्यावर ती चूक, तो पुन्हा करणारही नाही ! अन्यथा चुकणार्यांची संख्या कधी कमी होणारच नाही ! जसं सत्पात्री के...

कविता : 🌷' अपार महती आईची '

कविता :🌷' अपार महती आईची ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : १४ मे २०२३ वेळ : १२ वाजून २२ मि. महासागराहूनही अति-विशाल असं जिचं काळिज अन् मऊ लोण्याहूनही मृदू-मुलायम असं जिचं मन, भयंकर-भयाण काळ्या रात्री मनाचा हिय्या करुन, तान्हुल्यासाठी पार करते, टकमक-टोक-जीवघेणं ! मोडेन-पण-वाकणार-नाही हा तिचा पक्का निर्धार वाट्टेल ते झालं तरी इकडची दुनिया तिकडे करणार ! "मेरी झांशी नहीं दूंगी" म्हणंत शत्रूला ललकारणार  दत्तक-पुत्राला पाठीशी बांधून, घनघोर रण लढणार ! आधुनिक काळातही तान्ह्या बाळाला पाठीवर बांधून, बांधकामात मोलमजूरीही करुन कुटुंबाचा गाडा रेटते ! संसाराला थोडा हातभार लागावा म्हणून नोकरी करुन नाईलाजाने मध्यमवर्गीय-आई, थेट पाळणाघर गाठते ! गर्भवती असताना पतिने अरण्यात सोडुन दिल्यावरही, सीतेने पुत्र लव-कुश यांना घडवले, प्रतिकूल स्थितीतही ! शंभर पुत्रांची माता गांधारी, पुत्राला अमर करण्यासाठी,  तिनं आयुष्यभराची पतिव्रतेची पुण्याई पणाला लावली ! नटखट-नटवर-खट्याळ कान्ह्याचं लालन-पालन करणारी, यशोदा मैया लाड पुरवूनही त्याला शिस्तपालन शिकवणारी ! अनाथ-अपंग-दुबळ्या-दुर्दैवी-जीवांना...

कविता :🌷' अदृष्य-बंध '

कविता :🌷'  अदृष्य-बंध  ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : १४ मे २०२३ वेळ : १० वाजून १८ मि. आकाशाएव्हढा विशाल कागद अन् सागर-जलाची केली शाई तरी जन्मदात्या मातेची महती, कधीही लिहून पूर्ण होणार नाही ! नऊ-मास उरी-पोटी सांभाळून, सतत रात्रीचाही दिवस करून, हातांचा झुलता पाळणा करून इवल्या जीवाला ती ठेवते जपून ! नि:स्वार्थी प्रेमाची पखरण करून, अवघं जीवन टाकते हर्षाने उजळून निरपेक्ष भावे जीव टाकते ओवाळून संकटाचे सावटही, ती देते घालवून ! मुलं वयानं कितीही मोठी झाली तरी त्यांची काळजी आईच घेते सर्वतोपरी ! दोहोंमधील अदृष्य-बंध, अतूट-मजबूत  नाळ कापली तरी कायम राहती शाबूत ! नाळ कापूनही कायमचेच राहती शाबूत ! @तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता 🌷' ध्यास '

कविता : 🌷' ध्यास ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : गुरुवार, ४ मे २०२३ वेळ : संध्याकाळी ७ वाजून ४७ मि. वेणु वाजवूनी सूर छेडू नको सांजवेळी जीवा वेड लावू नको  थांब कान्हा जरा, जीव झाला खुळा  कुणी पाहील रे, दृष्ट लावील रे ll धृ ll रात काळी निळी, घनश्याम नीळा या यमुना जळी गोप गोपी मेळा  खेळ सारे तुझे, हे रुसणे तुझे वेड लावुनी रे, दूर जाशील का? कुणी पाहील रे, दृष्ट लावील रे ll १ ll लक्षणे ही तुझी, जीवघेणी जरी खुळी मी राधिका, आज झाले पूरी  जीव वेडा पीसा, ध्यास लागे तुझा हे गोड गुपित, वारा सांगेल रे कुणी पाहील रे, दृष्ट लावील रे ll २ ll  @तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता 🌷' फुलोरा '

कविता : 🌷' फुलोरा ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले  तारिख मंगळवार, २ मे २०२३ वेळ : दुपारी, २ वाजून ४९ मि. मनासह मानवी पंच-ज्ञानेंद्रियांना सदैव सुखावणारा रंग-गंध-स्पर्श-कान-जिव्हा यांच्यासाठीच हा फुलोरा ! मोरपंखी पिसं फुलवून नजर खिळवून ठेवणारा पिसारा  लांडोरचं लक्ष वेधून घेऊन, पूर्णपणे आकर्षित करणारा केकारव करतो-नर्तनही-करतो, फुलवून पिसांचा-फुलोरा,  मन वळवून लांडोरला राजी करण्याचा प्रणयाचा फुलोरा  गोंडस-निरागस-बाळांच्या मधाळ हास्याचा मुग्ध फुलोरा  उंबरठ्यावर तारुण्य,किशोरींच्या लज्जेचा मोहक फुलोरा प्रतिसाद पुलंच्या दर्जेदार खुसखुशीत लेखन वक्तव्याला, सभागृही खसखस पिकली असतानाचा विनोदी फुलोरा  ऋतुराजाच्या येण्याने बाग-बगीचा-कुंड्या-गच्ची-व्हरांडा वृक्ष-वेलींवर सप्तरंगात न्हाऊन निघालेला स्वर्गीय फुलोरा ! पावसाची सर पडून गेल्यावर पाना-पानावर थेंबांचा नजारा हलक्या हिम-वर्षावानं पूर्ण सृष्टी कवेत घेणारा शुभ्र फुलोरा ! सोनसळी श्रावणाच्या पिवळ्या-धम्मक उन्हाचा सोनेरी फुलोरा हेमंत-ऋतु-आगमनाची वर्दी देणा-या शीत-शिरशिरींचा फुलोरा ताटातूटी नंतर माय-लेक-भेटीचा हृदय-स्प...

कविता : 🌷' ओलावा '

कविता 🌷 ' ओलावा ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : सोमवार, १ मे २०२३ वेळ :दुपारी, १ वाजून २७ मि. सततची ओली चिकचिक खरंतर बिल्कुल आवडत नाही पण हेही तितकंच खरं की मायेच्या-प्रेमाच्या ओलाव्यावीण क्षणभरही जमत नाही ! उन्हाळ्यात तलखीनं 'दे माय धरणी ठाय'अशी होते गत पण हेही तितकंच खरं की दुभंगल्या-धरेतूनच इवला अंकुर हळुच असतो डोकावत ! आईविना पोरं, वात्सल्याचा-झरा सतत हुडकत राहतात  पण हेही तितकंच खरं की जिव्हाळ्याच्या-ओलाव्याने आपलीशी होऊन बिलगतात ! वाळवंटात झाडांची-मुळं खोल लांबवर सुसाट धावतात, पण हेही तितकंच खरं की पोषक-तत्वांची ओल मिळताच, त्याच जागी स्थिरावतात ! प्रत्येक जीवाला ओढ लागलेली असते, फक्त ओलाव्याची पण हेही तितकंच खरं की ती खर्याअर्थी मिळेपर्यंत, जीवाची तळमळ नाही संपायची ! जन्मा-पाठी-जन्म ओलाव्याच्या शोधातच भटकतो वणवण,  पण हेही तितकंच खरं की ज्या जन्मी तो ठेवा लाभतो, त्याचा प्रत्येक दिवस होतो सण ! ज्या जन्मी तो ठेवा लाभतो, त्याचा प्रत्येक दिवस होतो सण ! @तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆