कविता : 🌷“ दडलेले-ज्ञानामृत “. तारिख - रविवार, २१ जुलै २०२४
कविता : 🌷“ दडलेले-ज्ञानामृत “ कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : रविवार, २१ जुलै २०२४ आषाढ शुद्ध पौर्णिमेस गुरु-पौर्णिमा-दिन म्हणून गौरवितो महाभारत-कर्त्या-महर्षी व्यासांचा जन्मदिन, साजरा होतो आयुष्यामध्ये गुरुंचे आगमन म्हणजे थेट तेजाला आमंत्रण मनातील अज्ञान,संशयरुपी अंध:काराचे होते पूर्ण उच्चाटन सद्गुरु म्हणजे एकमेव-द्वितीय-जादूचं-अद्भुत-वाद्य, मृदंग ज्याच्या झंकाराने निनादती अंत:करणी अनाहत-नाद-तरंग सद्गुरुकृपा हे असे अद्भुत ज्ञान, की ज्याच्या प्राप्ती-पश्चात् नैसर्गिक-अनाठायी भयाचे होई-समूळ-निराकरण प्रत्यक्षात सद्गुरु, एक अशी महा-नदी की ती पंच-प्राणांतूनही वाहते अशी बासरी जिच्या मंजुळ नादे, मन आत्मानंदी मग्न होते गुरु म्हणजे शुद्ध अमृत,मनातील विकार-रुपी-विष-नष्ट होते या ज्ञानामृत-लाभे अंतरीची तृषा पूर्णतया शमते, हाव मिटते गुरु म्हणजे कुबेराचा असा अक्षय-खजिना,मोल होणार नाही गुरुकृपा-असा प्रसाद,जो लाभता कशाची इच्छाच उरत नाही गुरु म्हणजे सत्-चित्-आनंद,जो"स्व"ची खरी ओळख घडवतो गुरु अशी दीक्षा आहे की, दीक्षित व्यक्ती-भवसागर पार करतो गुरु म्हणजे...