Posts

Showing posts from July, 2023

कविता : 🌷' शोध '

कविता : 🌷' शोध ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले वो तारिख : शुक्रवार, २८ जुलै २०२३ वेळ : दुपारचे २ वाजून ३५ मि. उभं आयुष्य फक्त सुखाचा ध्यास असतो त्यामुळे झापडं बांधून जणू घोडाच बनतो सुखाच्या पाठीमागून स्वैर धावतच सुटतो क्षणिक थांबून विचार करायला वेळ नसतो  लहान वयात सारं कोड-कौतुकच असतं  पण तारुण्यात पुन्हा तेच करावंसं वाटतं तरुणाई कधी ओसरली याचं भान नसतं  यंत्रवत जीवन ढकलणं पुढे चालूच राहतं जीवनाच्या-तिसऱ्या-टप्प्यात जाग येते, सुधारण्याची थोडीफार धडपडही होते ! पण एव्हाना तन-मन दोन्ही बंड पुकारते केविलवाणी धडपड मग हातपाय गाळते ! बिकट परिस्थितीत आतून ऐकू येतो बोल, "सुख बाहेर शोधण्यापेक्षा मनांतर्गत शोध" "मनाला लगाम घालून, आवर आता क्रोध" "शांत-स्थिर-चित्त"अमूल्य-अंतस्थ-गुरुबोध काम-क्रोध-लोभ-मदादि षडरिपु सर्व नश्वर, अंतरीच्या गाभाऱ्यात स्थित, काशी-रामेश्वर प्रफुल्लित मनात वसते कैलास-मानसरोवर मनाच्या काना-कोपऱ्यात स्थित असे ईश्वर ! शोध घ्यायचा असेल तर हवी 'मानस'यात्रा अन्यथा सर्वत्र मानवी-खल-वृत्तींचीच जत्रा क्षणभंगुर जीवनी जर हवी चिरंतन शांतता...

कविता 🌷' गहिवर '

कविता 🌷' गहिवर ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : बुधवार, २६ जुलै २०२३ वेळ : दुपारचे १ वाजून १० मि. माणसाच्या जिवंतपणाचं लक्षण म्हणजे 'गहिवर' आतून  जो मृत ,  त्याला फुटतंच नाही कधी पाझर ! अलिकडे माणसं यंत्रवत-कोरडी का बरं होत आहेत ? स्वार्थापोटी आतल्या-आतच आकसत जात आहेत ! कुणी कितीही-पोटतिडकीने सांगो फरक पडत नाही त्यांची पंचेंद्रियं बंद म्हणून कानात काही शिरत नाही ! भावनाशून्य झाल्याने मन-बुध्दि-काया झालीय बोथट सतत इर्षा-जीवघेणी स्पर्धा, काहीच नाही सर-धोपट ! स्वतःवरुन जगाकडे बघून सगळं वाटंत असावं काळं, सरळ-स्वच्छ वागणूकीतही शोधत बसतात काळंबेरं ! स्वतःच्या नाकावरच मस्त बस्तान बसवू दिलेली माशी,  बिंब पाहून-आरसा कितीही धुवून पुसून, जाणार कशी ? "आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्टं"-हे किती काळ ? दिवस पालटल्यावर, कुठेच शिजणार नाही यांची डाळ ! सृष्टीच्या साम्रज्यात सगळीकडे आल्हाददायक हिरवळ, ओझरता कटा‌क्ष टाकला तरी पळून जाते सारी मरगळ ! भू-स्वर्ग-पाताळ या कवि-कल्पना, मुळीच नाहीत भ्रामक निस्वार्थाने-सत्कर्म-परोपकार केल्याने उभे राहते स्मारक ! दिवसा ऊन-पाऊस-थंडी...

कविता 🌷' समझने की बात '

कविता :🌷 ' समझने की बात ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : गुरुवार, २० जुलै २०२३ समय : दोपहर के ३ बज के १३ मि. बंदे की बंदगी ऐसी उंचाई पर है ले जाती, अनगिनत-भक्तों के मनमें, छबी बन जाती जीवनभर के सत्कर्म बनातें हैं उसे महान् हर भक्त के हृदय में रहता है अटल-स्थान ! गोरा-रंग-सुंदर-तन कुछ मायने रखता नही उंचा कद-उंचा होदा-धन-संपत्ती कुछ नहीं ! सारी-की-सारी दुनियादारी होगी एक तरफ, सबको प्यार से बांधना, शक्ती है दुसरी तरफ  महकते सप्तरंगी-फुलों के चमन एक तरफ ईश्वरीय-कृपा की जादूई-खुशबू दुसरी तरफ हर-रात आसमां में लाखों-सैंकडों है सितारे धरती पे दिन-रात सिर्फ बाबा आप ही हमारे काले-घने बादलों से घनघोर वर्षा बरसती है बाबा का शुभाशीश-कृपांमृत की बरसात है ! साईं-के-दरबार में अगर सीने में  होगा  गुरूर, दया-क्षमा-शांति-भावना से होगा वो चूरचूर ! ना चाह है पैसों की और न चाह है टकों की, बाबा को आस है भक्ती के सच्चे लगन की ! बडप्पन- ताम-झाम  शानों-शौकत,  झूठमूठ की ये सब दौलत की छनकार है बिना मतलब की  प्रेम से देना भूखों को भोजन, प्यासों को पानी है यही सच्ची-सेवा-भक्ती...

कविता :🌷'मांगल्याचं प्रतिक'

कविता :🌷'मांगल्याचं प्रतिक'  कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : सोमवार, १७ जुलै २०२३ वेळ : ११ वाजून २४ मि. कोणत्याही कार्याची-कार्यक्रमाची-सुरुवात, सामान्यत: दीप-प्रज्वलन-करुनच करतात ! हिंदू-संस्कृतीनं दिव्याला विशेष दिलं महत्त्व, दीपाच्या-माध्यमातून मांगल्य-समृद्धीचं-तत्व ! अग्नि-प्रती कृतज्ञ-भाव व्यक्त करण्यासाठी, पुरणाचे दिवे व त्यात साजूक तुपातील वाती नितांत सुंदर, शांत-पवित्र वातावरण-निर्मिती मनोभावे-पूजन-अर्चनाने प्रसन्न होई चित्तवृत्ती  मना-मनांत-अज्ञान-रुपी-अंध:काराची भीती,  ज्ञान-दीप उजळून, दिव्य-प्रकाशाची प्रचिती ! श्रावणाच्या पवित्र आगमनाची आगामी वर्दी, सोमवारची-दीप-अमावास्या होते "सोमवती"! यथासांग ‘दीप-पूजनाचा-विधी' करुन संपूर्ण, पुरणाचे दिंड बनवून गोड-नैवेद्य होतो अर्पण ! सगळे जीभेचे चोचले श्रावण सुरु होण्याआधी,  आषाढी-अमावास्येला खवय्ये यथेच्छ पुरविती ! आयुष्यात सुख-शांती-तृप्तीसाठी मूक-आवाहन, सूर्यस्वरुप-अग्निरुप-तेजस्वी लक्ष्मीचं गृहागमन! मानस-पूजा स्वीकार होऊन, इच्छा होवोत पूर्ण दु:खाचा विलय होऊन-दरेक क्षण होवो सुवर्ण ! दिव्यांची पूजा केल्याम...

कविता :🌷 ' या-सम-हा '

कविता :🌷 ' या-सम-हा ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : सोमवार, १० जुलै २०२३ जन्मत:च अत्यंत बुद्धिमान, निव्वळ तेरा वर्षांचं वय असताना... स्वतंत्रतेचं स्त्रोत्र-स्वदेशीचा फटका-सारसंग्रहादी अद्भुत रचना ! इतकी अथांग देशनिष्ठा की निष्ठेलाही किंचित संकोच वाटावा... इतकं निडर-अगाध-देशप्रेम की बर्फाळ पाण्याला घाम फुटावा ! बंदीवासात दररोज कोलूच्या-बैलांसारखं जुंपूनच तेल काढलं  राबराबून-काबाडकष्ट करुन अर्धपोटी-स्थितीतही लेखन केलं ! अंदमान-काळकोठडीत हरप्रकारे छळून-खड्या बेडीत टांगलं, तेल-घाण्याला जुंपलं-नारळाचा काथ्या कुटण्याचं कामही केलं... कारागृही लेखणी नसूनही कोळशाने भिंतींवर लिहिलं रात्र-रात्र... लिहिली पुस्तकं, कविता, महाकाव्यं, ग्रंथ, नाटकं, आत्मचरित्र ! अंदमान-कारागृही बाभळीच्या काट्याने भिंतीवर कोरुन लिहीलं, 'Essentials of Hindutva' या अप्रतिम ग्रंथाचं लिखाण केलं ! देश-स्वातंत्र्य-प्राप्ती अन् ते मिळवल्यावर देशाच्या सुराज्यासाठी, रात्रं-दिवस अतोनात अविश्रांत परिश्रम घेतले, जन-जागृतीसाठी ! खरोखरचे द्रष्टा असल्याने जातिभेद-निर्मूलनासाठी अस्पृश्यांसाठी, आंतरजातीय-लग्नं...

कविता :🌷 ' अनमोल नर-रत्न '

कविता :🌷 ' अनमोल नर-रत्न ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : सोमवार, १० जुलै २०२३ वेळ : दुपारी १ वाजून ३१ मि. जन्मत:च अत्यंत बुद्धिमान निव्वळ तेरा वर्षांचं वय असताना, स्वतंत्रतेचं स्त्रोत्र-स्वदेशीचा फटका-सारसंग्रहादी अद्भुत रचना ! इतकी अथांग देशनिष्ठा की निष्ठेलाही किंचित संकोच वाटावा इतकं निडर-अगाध-देशप्रेम की बर्फाळ पाण्याला घाम फुटावा ! बंदीवासात कोलूच्या-बैलांऐवजी जुंपून तेल काढावं लागलं ! राब-राबून-काबाडकष्ट करुन अर्धपोटी-स्थितीत लेखन केलं ! अंदमान-काळकोठडीत हरप्रकारे छळले खड्या बेडीत टांगले, तेल-घाण्याला जुंपले-नारळाचा काथ्या कुटण्याचे कामही केले कारागृही लेखणी नसताना रात्रभर कोळशाने भिंतीवर लिहून,  ते पक्कं स्मरणात बंदिस्त ठेवून, पुसून, नवीन लेखन करायचं ! रोज त्याच कृतीची पुनरावृत्ती करुन त्यांनी एक-दोन नाही तर, तब्बल दोन हजार ओळींचं 'कमला' हे महाकाव्यं होतं लिहीलं ! अंदमान-कारागृही बाभळीच्या काट्याने भिंतीवर कोरुन लिहीलं, 'Essentials of Hindutva' या अप्रतिम ग्रंथाचं लिखाण केलं ! देश-स्वातंत्र्य-प्राप्ती अन् ते मिळवल्यावर देशाच्या सुराज्यासाठी, रात...

कविता :🌷 ' हुरहुर '

कविता :🌷 ' हुरहुर ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : शनिवार, ८ जुलै २०२३ वेळ : दुपारी २ वाजून ५३ मि. रुणुझुणु पैंजण पायी वाजती हृदयामध्ये निनाद होती मधुर स्वर ते झंकारले  गं काय करु आता काही न कळे || धृ || बासरीची सुरेल मंजुळ बोली समजून राधा झाली बावरी संदेशाने लाजून लाली हुरहुर मनीची गाली पसरे  गं काय करु आता काही न कळे || १ || हळुहळु सावळी सांज आली  पाखरांची किलबिल वाढू लागली घरट्यात पिलांना भूक लागली पंखात पिलांची ओढ खेचते गं काय करु आता काही न कळे || २ || यमुना जळी प्रतिबिंब बघुनी चंद्र नभीचा गेला लपूनी चांदण्यांशी खेळ खेळुनी प्रितीचा प्रकाश त्यातून झळके  गं काय करु आता काही न कळे || ३ || @तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता 🌷' माणूस नामक गूढ बेट '

कविता :🌷' माणूस-नामक-गूढ-बेट ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : बुधवार, ५ जुलै २०२३ वेळ : दुपारी, ४ वाजून ५० मि. घोडेस्वार घोड्याला पाणवठ्यावर सोडतो, तहान असेल तर घोडा पोटभर पाणी पितो अन्यथा घोडा जागेवरुन हलत सुध्दा नाही ! कोणी जबरदस्तीने पाणी पाजू शकत नाही ! अंतस्थ-गुरुची तोंड-ओळख सद्गुरु करतात शिष्यास ते जाणून घ्यायची ओढ असल्यास, त्या-पथावर अध्यात्मिक प्रगती करु शकतो, किंवा संसार-रुपी-चक्रात गटांगळ्या खातो ! पाणी किती पितो, घोड्याची तहानच ठरवते गुरु-निर्देर्शित सन्मार्गी-वाटचाल, तहान करते गुरु-हे-माध्यम,'अंतस्थ-महागुरु'चे-भान देते ! तम वितळून, अंत:करण स्वयं-प्रकाशित होते  अंतस्थ-गुरु-भेट म्हणजे जीवा-शिवाची भेट  आजवर मनात दडलेल्या प्रश्नांची, उत्तरं थेट ! जन्म-मृत्युच्या-कचाट्यात-जणू-कमळाचे देठ  लख्खं-सूर्य-प्रकाशी, माणूस-नामक-गूढ-बेट ! @तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता :🌷' शाश्वत आनंद '

कविता :🌷' शाश्वत-आनंद ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : सोमवार, ३ जुलै २०२३ वेळ : रात्रीचे ८ वाजून २३ मि. जन्मा-आधीपासून शिक्षण सुरु होतं  पुढे अनंत काळा-पर्यंत सुरुच रहातं    शिकवणारे सगळे गुरु-जन, सद्गुरु ! जन्मदाते-माता-पिता हेच आद्य-गुरु ! आयुष्यभरात अगणित होतात सद्गुरु व्यक्ती-प्राणी-पुस्तकं-निसर्ग वा वास्तु सद्गुरु हे शिष्यांसाठी जणू 'कल्पतरु' ! ज्ञानदान-यज्ञ व आशिर्वचन 'तथास्तु'  ! सिध्दपदासाठी दत्तगुरुंनी २४ गुरु केले दर गुरुच्या सर्वोत्तम-गुणांचे ग्रहण केले ! दुर्गुण दुर्लक्षुन जोपासली गुण-ग्राहकता, व्यक्ति-विकास होऊन, वाढेल गुणवत्ता ! कधी अंतस्थ-हेतूने, कधी नाईलाजाने  एकाचा गुरु होणं टाळलं द्रोणाचार्यांनी निराश न होता-अंतस्थ-सद्गुरु-भक्तिने  एकलव्य झाला श्रेष्ठ-धनुर्धर, परिश्रमाने ! परशुरामांसम-गुरु प्राप्त करण्यासाठी, शूर-वीर कर्णाने लपविल्या कैक गोष्टी मिळवलं ज्ञान-युद्ध-कौशल्य-रणनीती गुरु-सेवा करुनही शाप मिळाला अंती ! सांदिपनी ऋषींच्या गुरुकुल-आश्रमात  श्रीकृष्ण-बलराम दोघेही झाले निष्णात  अध्ययनाने त्यांनी ज्ञान केले आत्मसात...

कविता :🌷' गुरुदक्षिणा '

कविता :🌷' गुरुदक्षिणा ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : सोमवार, ३ जुलै २०२३ ||श्री कृष्णम् वन्दे जगत्गुरुम् || जन्मापासूनच शिक्षण होतं सुरु ते अनंत काळा-पर्यंत रहातं सुरु   शिकवण देतो तो होतो सद्गुरु ! आयुष्यात अगणित होतात सद्गुरु व्यक्ती-प्राणी-स्थिती-आत्मा-वास्तु शिष्यांसाठी सद्गुरु जणू 'कल्पतरु'  कृतज्ञतेने देती आशिर्वाद 'तथास्तु' ! कधी अंतस्थ-हेतूने, कधी नाईलाजाने  योग्यता जाणूनही शिष्यास नाकारती नाउमेद न होता-अंतस्थ-गुरुच्या साक्षीने  एकलव्या-सम श्रेष्ठ-धनुर्धर या जगती ! परशुरामांसम-गुरु प्राप्त करण्यासाठी शूर-वीर कर्णाने लपविल्या कैक गोष्टी ज्ञानार्जन-युद्ध-कौशल्य-कूट-रणनीती गुरुसेवा करुनही शाप मिळाला शेवटी ! सांदिपनी ऋषींच्या गुरुकुल आश्रमात  श्रीकृष्ण-बलराम दोघेही झाले निष्णात  गुरु-सेवेतून त्यांनी ज्ञान केले आत्मसात  शंखासुर-वध करुन वाचविले गुरु-पुत्रास गंगातीरी आदि शंकराचार्य चालत होते गंगेच्या दुसऱ्या तीरी काही शिष्य होते  गुरुआज्ञेने शिष्य गंगाजल चालून आला गंगातटी उमलत्या-कमळांचा पूल झाला ! 'गुरुआज्ञा-प्रमाण'या विश्वासाचा ...

कविता : 🌷' मंतरलेलं बालपण '

कविता :🌷' मंतरलेले दिवस ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : शनिवार, १ जुलै २०२३ वेळ : रात्रीचे ८ वाजून ५० मि. आज मागे वळून पाहिलं तर, उभं ठाकलं अवघं बाल-पण ! किती भाबडं-निष्पाप-जीवन ! निर्भेळ आनंदात क्षण-न्-क्षण  किरकोळ कारणांनी कट्टी-बट्टी, दुसऱ्याच क्षणात जमायची गट्टी ! खूप आनंददायी अनपेक्षित सुट्टी इवल्याशा निमित्ताने-गळा-मिठी एकदा सहलीला गेलो असताना पट्ट-मैत्रिणीशी कट्टी केली होती ! जेव्हा पावसाळी-चप्पल तुटली, तिनं तिची-नवीन चप्पल दिली ! त्यामुळे कट्टीची लगेच बट्टी झाली  खोटा-राग जाऊन मैत्री घट्ट झाली ! तिच्या गोब-या-गाली आली लाली, कायम-जीवाभावाची सखी झाली ! निमित्त होतं सहलीत-चप्पलेचं-तुटणं   रुसवा-फुगवा सोडून मैत्री घट्ट करणं म्हणून महत्त्वाचं असतं संस्कार होणं भाग्यानं लाभलं हे मंतरलेलं-बालपण ! @तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता 🌷' पाऊस असा पडावा '

कविता :🌷' पाऊस असा पडावा ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : शनिवार, १ जुलै २०२३ वेळ : दुपारचे २ वाजून ०१ मि. वाटलं रमत-गमत मस्त जावं फिरायला नट्टा-पट्टा करुन लगेच निघालो जायला, हसत-खिदळतच अवघा ताफा निघाला  एवढ्यात थंड-गार-सुसाट वारा सुटला ! अचानक सृष्टीचा नक्षाच पार बदलला, आभाळात काळ्या ढगांनी फेर धरला, हे पाहून मग सूर्यानेही गाशा-गुंडाळला ! चक्क त्यांच्या मागेच जाऊन तो लपला ! वळवाच्या-पावसाचा हा राग-रंग बघता,  सर्वांनी वळचणीलाच आडोसा घेतलेला  टपरीवरच्या कांदा-भज्यांचा फन्ना केला ! वाफाळत्या-चहाचा आस्वादही घेतलेला ! खात-पीत गप्पा-टप्पांना ऊतच आलेला, बाहेर पाऊसही होताच स्पर्धा करायला ! वेळ कसा कापरा-सारखा उडून गेलेला, भानावर आलो तेव्हा पाऊस थबकलेला ! सर्वांनी मग गप्पा व हात आवरता घेतला जड अंतःकरणाने काढता पाय घेतलेला ! चाललो नसलो तरी मनाचा-तजेला वाढला  वळवाचा हा पाऊस पक्का लक्षात राहीला ! @तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆